"दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक...", 'आदिपुरुष'वर बंदी घाला", कॉंग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:14 PM2023-06-19T18:14:11+5:302023-06-19T18:14:43+5:30
आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. विविध राजकीय पक्षांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अशातच महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक असल्याची टीकाही त्यांनी केली. "रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या", असेही त्यांनी सांगितले.
"रामायण आणि महाभारत या मालिका काँग्रेसच्या काळात चित्रित झाल्या होत्या. रामायण आणि महाभारताचे वास्तव काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात त्यावेळी ठेवले होते. भाजप स्वतः म्हणते की हे हिंदूंचे सरकार आहे, त्यामुळे हनुमानजींना टपोरींसारखे वक्तव्य करायला लावण्याचे पाप भाजपने केले आहे. ही भाजपची मोठी चूक आहे, त्यांनी माफी मागावी आणि आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालावी", अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
#WATCH कांग्रेस के समय में रामायण और महाभारत सीरियल को फिल्माया गया था। कांग्रेस ने उस समय में रामायण और महाभारत की वास्तविकता रखी थी। भाजपा खुद बोलती है कि वो हिंदु की सरकार है तो हनुमान जी को इस तरह से टपोरी जैसे वक्तव्य करवाने का पाप भाजपा ने किया है...ये भाजपा का दोष है,… pic.twitter.com/90xFHfPfTF
— ANI_HindiNews (@AHindinews) June 19, 2023
आदिपुरूष चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) हा निर्णय घेतला असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. चित्रपटातील संवाद बदलण्याचे आश्वासनही लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, निर्मात्यांनी संवाद बदलण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या मला मिळाल्या आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
विरोध अन् प्रचार 'आदिपुरूष' सुसाट
आदिपुरूष चित्रपटाला वाढत चाललेला विरोध चित्रपटाला फायदा करून देत असल्याचे दिसते. कारण चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत. अलीकडेच निर्मात्यांनी काही संवाद बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे सुधारित संवादांसह चित्रपट दाखवण्यात येणार आहे. खरं तर राजकीय पक्ष देखील 'आदिपुरुष'वरून रिंगणात उतरले आहेत. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.