"शेवटी काय भाजपाचे संस्कार..."; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसचा खोचक टोला, शेअर केला 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:21 AM2023-01-22T10:21:18+5:302023-01-22T10:22:37+5:30

Maharashtra Congress Slams BJP : काँग्रेसने पंकजा मुंडेंवरून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. 

Maharashtra Congress Slams BJP Over Pankaja Munde And Chandrashekhar Bawankule | "शेवटी काय भाजपाचे संस्कार..."; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसचा खोचक टोला, शेअर केला 'तो' Video

"शेवटी काय भाजपाचे संस्कार..."; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसचा खोचक टोला, शेअर केला 'तो' Video

googlenewsNext

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचं म्हटलं. मात्र, गेवराई येथील कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या अगोदर भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ संदर्भातही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल अफवा पसरवणारा एक गट भाजपातच आहे, असेही त्यांनी म्हटले. याच दरम्यान आता काँग्रेसने पंकजा मुंडेंवरून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. 

"शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच एक व्हि़डीओ देखील शेअर केला आहे. "जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!" असं म्हणत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. 

"भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट"

“भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो असे म्हटले. हाच त्यामागील आशय होता, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी व्हायरल व्हिडिओबद्दल दिलं आहे. 

पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री फडणवीस गेल्या २० दिवसांत बीड जिल्ह्यात दोनवेळा येऊन गेले. त्यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांची गैरहजेरी होती. या दोन्ही ताईंच्या गैरहजेरीची चर्चा झाली. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. मात्र, बावनकुळे यांच्या गेवराई दौऱ्यावर या बातम्यांवर पडदा पडला आहे.

"माझ्या नाराजीबाबत प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले"

माझ्या नाराजीबाबत प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. त्यांना मी ओव्हरटेक करीत नाही. प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे. त्या दोन्ही कार्यक्रमांत मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे आले नाही. आज गेवराईतील पक्षाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. यापूर्वीही जे. पी. नड्डा आले होते तेव्हा मी आले होते, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Maharashtra Congress Slams BJP Over Pankaja Munde And Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.