"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:32 PM2024-06-07T18:32:31+5:302024-06-07T18:33:18+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं राज्यातील सर्व नवनियुक्त खासदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. त्यात १४ खासदार उपस्थित होते.

"Maharashtra Congress State of Thought; Lok Sabha Battle Won Now Lakshya Vidhan Sabha" - Ramesh Chennithala | "महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"

"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"

मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले. जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे. एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचं आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू असा विश्वास काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली, यावेळी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, आघाडीचे राजकारण सोपे नसते पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली व निवडणुकीला सामोरे गेलो. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ जाहीर सभा घेतल्या, मंगळसुत्र, हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे पुढे करत विभाजनकारी राजकारण केले पण जनता यावेळी मोदींच्या अपप्रचाराला बळ पडली नाही असं त्यांनी सांगितले. 

तर राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले व जनतेत मोठा आत्मविश्वास निर्माण केला. देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत व मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादीत केला आहे. काँग्रेसच्या या विजयात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे समर्थन आहे. काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला. 

दरम्यान,  काँग्रेस पक्षाची २०१९ च्या निवडणुकीत चांगली कामगिरी झाली नव्हती. २६ जागा लढवून १ जागा जिंकू शकलो पण यावेळी मात्र १७ जागा लढवल्या व १४ जागेवर घवघवीत यश संपादन केले आहे. हे यश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे शक्य झाले आहे. लोकसभेच्या विजयात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे मार्गदर्शन व योगदान अत्यंत महत्वाचे आहे असे सांगत मुकूल वासनिक यांनी या वरिष्ठ नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला व टाळ्याच्या गजरात तो एकमताने संमत करण्यात आला.

Web Title: "Maharashtra Congress State of Thought; Lok Sabha Battle Won Now Lakshya Vidhan Sabha" - Ramesh Chennithala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.