Coronavirus Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत(बुधवारी) महाराष्ट्रात कोरोनाचे 1,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान 9 जणांचा मृत्यूही झाला आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5421 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 560 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे.
थर्मल स्कॅनिंग सुरूकोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग सातत्याने केले जात आहे. कोरोना चाचणीसाठी 2 टक्के नमुने घेण्यात आले आहेत. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल दिल्लीत कोरोनाचे सुमारे एक हजार नवीन रुग्ण आढळले.
देशात कोरोनाचे 40,215 सक्रिय रुग्णगेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूचे सुमारे आठ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40,215 झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 5,31,016 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.