Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत असला तरी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरात ४०,९२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पण आज एकही ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षा अधिक पटीनं ओमायक्रॉनचा व्हेरिअंटचा प्रसार होतो असं अभ्यासात समोर आलं आहे. त्यामुळे जगभरात ओमायक्रॉनची धास्ती असताना महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनचा एकही आढळलेला नसल्यानं मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील आजचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात आज दिवसभरात ४० हजार ९२५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ हजार २५६ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन रुग्णराज्यात आतापर्यंत एकूण ८७६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले असून आतापर्यंत ४३५ रुग्णांनी ओमायक्रॉन व्हेरिअंटवर यशस्वीरित्या मात केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्यात आज एकही ओमायक्रॉन व्हेरिअंटचा रुग्ण आढळलेला नाही.