शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

CoronaVirus News: भयावह! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; मृतांच्या आकड्यानं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:14 PM

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली

Maharashtra Corona Updates: गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. दोन दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजारांनी खाली आला होता. मात्र आता एकाच दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत १२ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २२७ जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात प्रथमच एका दिवसात इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मोठा दिलासा! आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची  'RTPCR' चाचणी; राजेश टोपेंची घोषणाराज्यात गेल्या २४ तासांत २३ हजार ६०० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा एकूण आकडा २४ लाखांच्या पुढे गेला. राज्यात आतापर्यंत २८ लाख १२ हजार ९८० जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ५४ हजार ६४९ जण दगावले आहेत. तर सध्याच्या घडीला ३ लाख ५६ हजार २४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ सुरू होती. मात्र काल आणि परवा कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. काल राज्यात २७ हजार ९१८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर २३ हजार ८२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला. रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र दोनच दिवसांत हा आकडा १२ हजारांनी खाली आला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस