Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९,१७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर १४४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता ३२ हजार २२५ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली असून ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ४६० वर पोहोचला आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.३५ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. तर मृत्यूचा दर २.११ टक्के इतका आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत ६ हजार ३४७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या २२ हजार ३३४ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात काल ८,०६७ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. आज हाच आकडा ९ हजारांच्या पार पोहोचला आहे. त्यामुळे येत्या दिवसात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन करण्याबाबत कोणताही विचार नसला तरी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.