कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत महराष्ट्रात तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत एका दिवसात तब्बल १२,०६,३२७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्रानं २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ जणांना लसीचे डोस देत सर्वाधिक संख्या नोंदवली होती. परंतु शनिवारी एका दिवसात राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले. सध्या लसींचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.