मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 58,924 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 351 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना मृत्यू दर 1.56 टक्के एवढा झाला आहे. याशिवाय आज नवीन 52,412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के एवढे आहे. (Maharashtra CoronaVirus updates Today newly 58,924 patients have been tested as positive, 351 dead)
आतापर्यंत एकूण 31,59,240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 6,76,520 वर पोहोचली आहे. तर राज्यात 37,43,968 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि 27,081 जण इंस्टिट्यूशनल क्वारंटइनमध्ये आहेत.
CoronaVirus : Google Maps वर असं सर्च करा कोरोना टेस्ट सेंटर आणि व्हॅक्सीन सेंटर
राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण - देशात 1 मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. देशात लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केले जाणार आहे. तसेच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत. तर 50 टक्के लसी कंपन्यांना केंद्र सरकारला पुरवाव्या लागतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत 24 तासांत 57 जणांचा मृत्यू - कोरोना व्हारसर पसरण्याचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना रोजच्या रोजच नवा विक्रम करत आहे. अशीच स्थिती मुंबईचीही आहे. येथेही रोजच्या रोज सक्रीय रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत 7381 नवे रुग्ण नोंदवले गेले. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 57 जणांचा मृत्यू झाला.
'या' 6 राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नियम कडक -केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड राज्य कोरोनाचा विचार करता संवेदनशील आहेत, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांच्या आत करण्यात आलेल्या आरटीपीआर तपासणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे. या संवेदनशील भागांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रासाठी अनारक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यात येणार नाही. प्रवाशाजवळ आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास त्याची रॅपिड अँटीजन टेस्ट केले जाईल.
देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!
...तर हातावर मारण्यात येणार 15 दिवसांचा क्वारंटाइन स्टम्प -तपासात पॉझिटिव्ह अथवा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येईल. याशिवाय, ज्यांनी आपल्यासोबत आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणला आहे अथवा स्टेशनवर तपासादरम्यान अँटीजन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे, अशांच्याही हातावर 15 दिवसांच्या क्वारंटाइनचा स्टम्प मारण्यात येणार आहे. लक्षण आणि पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना इंस्टिट्यूशनल क्वारंटानिमध्ये पाठविण्यात येईल.