Maharashtra Coronavirus Case: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी राज्यात 131 नवीन रुग्ण आढळले. यासह राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 701 वर पोहोचली आहे. चिंताजनक बाबा म्हणजे, कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून, ही संख्या 29 पर्यंत वाढली आहेत.
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत आतापर्यंत 137 आणि पुण्यात 126 रुग्णांची पुष्टी झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे. याचे नेतृत्व ICMR चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये सात सदस्य आहेत.
देशात 841 नवीन रुग्णांची नोंद पुण्यात JN.1 रुग्णांची संख्या 15 वर पोहचली आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. एका 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. दुसरीकडे, रविवारी देशात कोरोनाचे 841 नवीन रुग्ण आढळले, जे गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्ताने होणारी गर्दी वाढल्याने कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.