मुंबई :
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
काय म्हणतो अहवाल?औष्णिक वीज निर्मिती केंद्रे, घन कचरा जाळणे व वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे राज्यातील एअरोसोल प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणावर आतापर्यंत सर्वाधिक परिणाम हा कोळसाधारित वीज निर्मिती प्रकल्पांमुळे झाला आहे. प्रकल्पांची क्षमता वाढविणे सुरूच राहिले तर राज्याचा समावेश सर्वाधिक धोकादायक पातळीवर होईल.
धोका काय? - प्रदूषित धूलीकणांमध्ये सागरी मीठ, धूळ, सल्फेट, ब्लॅक आणि ऑरगॅनिक कार्बन यांच्या अतिसूक्ष्म कणांचा समावेश असतो.- श्वसनाद्वारे ते शरीरात गेल्यास मानवी आरोग्यास घातक असतात.
कोलकाताच्या बोस इन्स्टिट्यूटच्या जाणकारांनी ‘अ डीप इनसाइट इन टू स्टेट लेव्हल एअरोसोल पोल्युशन इन इंडिया’ या शीर्षकाचा अभ्यास अहवाल प्रकाशित केला.
महाराष्ट्रात कोळसाधारित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता किमान १० गिगा वॉटने कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. - मोनामी दत्ता, वरिष्ठ अभ्यासक, बोस इन्स्टिट्यूट.महाराष्ट्र धोकादायक झोनमध्ये आहे. वाढत्या प्रदूषणामुळे राज्य अति धोकादायक वर्गवारीत जाण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये मृत्यूदर वाढण्याची, तसेच आयुर्मान कमी होण्याबरोबरच आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.- डॉ. अभिजित चटर्जी, बोस इन्स्टिट्यूट.