शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

Maharashtra Day: जगात फडकेल महाराष्ट्राची पताका, 'हे' आहेत भावी सचिन, सुनील, खाशाबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 10:00 AM

महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील भविष्यकाळ सोनेरी असणार आहे

पृथ्वी शॉ- मुंबईच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वी शॉ याला भारताच्या युवा संघाचे क्रिकेट विश्वचषकात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पृथ्वीने या संधीचे सोने केले. आपल्या नेतृत्वाच्या जोरावर त्याने भारताला युवा विश्वचषक जिंकवून दिला.

श्रेयस अय्यर- मुंबईकडून खेळत असताना धडाकेबाज क्रिकेटपटू म्हणून श्रेयस अय्यरने आपली ओळख निर्माण केली होती. पण आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरने कर्णाधरपद सोडले आणि संघाची कमान श्रेयसकडे सोपवण्यात आली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर भारताचे नेतृत्व कोण करेल, याचे उत्तम श्रेयस असू शकते.

स्मृती मानधाना- भारतीय महिला संघात सातत्यपूर्ण फलंदाजी करणारी खेळाडू, असा लौकिक स्मृती मानधानाने मिळवला आहे. आतापर्यंतच्या तिच्या कामगिरीवर नजर फिरवली तर स्मृतीने भारताच्या विजयात किती मोलाचे योगदान दिले आहे, हे समजू शकते. स्मृतीने यापुढेही अशीच कामिगरी केली तर भविष्यात महान क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण होऊ शकते.

राहुल आवारे- राहुल आवारे या आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या मल्ल्यावर राष्ट्रीय पातळीवर बऱ्याचदा अन्याय झाला. पण नुकत्याच गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आणि आपल्यावरील अन्यायाला कामिगरीने चोख उत्तर दिले. राहुलचा फॉर्म चांगला राहिला आणि त्याला संधी दिली तर राहुलकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा आपण करू शकतो.

प्रार्थना ठोंबरे- भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाबरोबर खेळण्याचा मान अवघ्या 19 व्या वर्षी पटकावला तो प्रार्थना ठोंबरेने. सानियाबरोबर महिला दुहेरी विभाग खेळताना प्रार्थनाने आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. आतापर्यंत बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. भविष्यात तिच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची अपेक्षा करता येऊ शकते.

विदीत गुजराती- विश्वनाथन आनंद आणि पी. हरीकृष्णा यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर गुण पटकावणारा बुद्धीबळपटू म्हणून विदीत गुजरातीचे नाव घेतले जाते. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ग्रँण्डमास्टर हा किताब आपल्या नावावर केला होता. त्यामुळे भविष्यात विदीतकडून मोठ्या अपेक्षा असतील.

जेमिमा रॉड्रिग्स- स्मृती मानधानानंतर दुसरे द्विशतक फटकावणारी महिला क्रिकेटपटू म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स. स्थानिक स्तरावर धडाकेबाद फलंदाजी केल्यावर तिला भारताच्या संघातही स्थान देण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तिने नेत्रदीपक कामिगरी केली होती. आगामी विश्वचषकात आता जेमिमा कशी कामगिरी करते, यावर साऱ्यांचे लक्ष असेल. 

पुजा सहस्रबुद्धे- भारतीय महिला टेबल टेनिस संघाने गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या महिला संघात महाराष्ट्राच्या पुजा सहस्त्रबुद्धेचा समावेश होता. या सुवर्णपदकामुळे तिच्याकडून आता अपेक्षा उंचावल्या आहेत.

ललिता बाबर- अॅथलेटिक्समध्ये भारताचे नाव उंचावणारी महिला धावपटू म्हणजे ललिता बाबर. आतापर्यंत ललिताने स्टीपलचेस या प्रकारात भारताला दोन पदके मिळवून दिली आहेत. वुहान येथे 2015 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत ललिताने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. कविता राऊतनंतर आता ललिताच्या कामिगरीवरच साऱ्यांच्या नजरा असतील.

पूजा घाटकर- अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, हीना सिद्धू, राही सरनोबत यांच्यानंतर महाराष्ट्रातील नेमबाजपटू कोण, याचे उत्तर असेल पूजा घाटकर. आतापर्यंत पूजाने राष्ट्रीय स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेन येथे 2017 साली झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत पूजाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

सनिल शेट्टी : सध्या गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसपटू सनिल शेट्टीने तब्बल दोन पदके पटकावली होती. पुरुषांच्या टेबल टेनिस संघाने गोल्डकोस्टमध्ये सुवर्णपदक पटकावले होते, त्यामध्ये सनिलचा समावेश होता. या स्पर्धेतच पुरुष दुहेरीमध्ये हरमीत देसाईबरोबर खेळताना सनिलने कांस्यपदक पटकावले होते. 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रCricketक्रिकेटSportsक्रीडा