अमरावती : स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत ३० एप्रिल रोजी अमरावती शहरात बैठक घेऊन १ मे अर्थात ‘महाराष्ट्र दिन’ हा काळा दिवस पाळला जाईल. याची सुरुवात अमरावतीमधून करू, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शनिवारी जाहीर केले.एका कार्यक्रमादरम्यान श्रीहरी अणे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाबाबत सकारात्मक असल्याचे सांगून ते म्हणाले, अन्य विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र, विदर्भ अजूनही मागासला आहे. त्यामुळे विदर्भ राज्य केल्यास हे चित्र बदलू शकेल. विदर्भातील शेतकरी व आदिवासी नागरिक आजही समस्यांच्या विळख्यात आहेत, ते विकासापासून कोसो दूर आहेत.मुंबई व पुण्यातील लोकप्रतिनिधी उगाचच वैदर्भीय लोकप्रतिनिधींवर आगपाखड करतात. विदर्भ राज्याची मागणी माझ्या वयापेक्षाही मोठी आहे. या चळवळीचे सुकाणू तरूण पिढीने आपल्या हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)नी हाणला. संसदेत ‘लॉबी’ निर्माण करण्याची गरजविदर्भ वेगळा केल्यास महाराष्ट्रात राज्य कुणाचे असेल, मुंबईवर राज्य करता येईल की नाही, याबाबत शाश्वती नसल्याने, काँग्रेस आणि भाजपाकडून वेगळे विदर्भ राज्य मिळणार नाही, असे अॅड. अणे यांनी अकोल्यात स्पष्ट केले.अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्य निर्मितीची प्रक्रिया केंद्रात होते. संसदेत ५१ टक्के मताने यासंबंधीचा कायदा करावा लागतो. त्यामुळे विदर्भ राज्यासाठी संसदेत ‘लॉबी’ निर्माण करण्याची गरज आहे.भाजपाचे सवडीचे धोरण भाजपाला त्यांच्या सवडीने विदर्भ वेगळा हवा, योग्य वेळ आल्यास आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे भाजपाकडून सांगण्यात येते. मात्र भाजपाच्या धोरणातील संदिग्धता आणि वेळकाढूपणा न समजण्या इतपत आम्ही दुधखुळे नक्कीच नाही, असा टोला अणे यांनी हाणला.
महाराष्ट्र दिन ‘काळा दिवस’ पाळणार
By admin | Published: April 03, 2016 3:50 AM