मुंबई : ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ नुसार देशभरात राज्यातील धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणानुसार महाराष्टÑात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी ३.८ टक्के इतके असून, ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या वर्षभरात १ लाख ४२ हजार व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले असून, त्यातील ६ हजार ३२४ जणांनी तंबाखू सेवन बंद केल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ‘तंबाखूमुक्त शाळा’अभियानांतर्गत २ हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा तंबाखूसेवनाने मृत्यूदेशात दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा तंबाखू सेवनाने मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी विनीत गिल यांनी शुक्रवारी दिली. तसेच, दर १६ व्या सेकंदाला एका मुलाला तंबाखूचे व्यसन जडते, असे सांगत तंबाखूविषयक कायदे कठोर होण्याची गरज व्यक्त केली. परळ येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयात तीन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स आॅन टोबॅको आॅर हेल्थ परिषदेत ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, २०१२ साली तंबाखू व तंबाखूजन्न सहा पदार्थांना राज्यात बंदी घातल्यानंतर आजपर्यंत १७६ कोटींची तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राज्यभरात याविषयी ४ हजार खटले दाखल असून त्यांची सुनावणी सुरू आहे.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात धूम्रपान, तंबाखूसेवनात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:05 AM