शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
3
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
7
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
8
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
9
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
10
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
11
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
12
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
13
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
14
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
15
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
16
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
17
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला

By अतुल कुलकर्णी | Published: May 07, 2024 9:44 AM

Ramesh Chennithala Interview: आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले.

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्र आणि देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यावर ‘भटकती आत्मा’ म्हणून टीका करणे, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांच्या शिवसेनेला ‘नकली सेना’ म्हणणे आणि महाराष्ट्रात जोडतोड करून सत्ता स्थापन करणे महाराष्ट्रातल्या लोकांना बिलकुल आवडलेले नाही, त्यामुळेच आम्ही कमी जागा मिळत असतानाही समन्वयाची भूमिका ठेवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण तयार झाले आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे मत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केले.

मुंबई लोकमत कार्यालयात ते आले होते. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात अंडर करंट काम करत आहेत. भाजपने दिलेले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही, त्याची यादी लोकच आम्हाला वाचून दाखवत आहेत. लोकांना परिवर्तन पाहिजे. महाराष्ट्रातल्या मोडतोड करून सत्तेवर आलेल्या सरकार प्रति लोकांची नाराजी आहे. शेतकरी, महिला, बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि महागाई सिलिंडरचे वाढलेले दर याविषयी लोकांच्या मनात तीव्र संताप आहे, हे प्रश्न निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देतील, असेही चेन्निथला म्हणाले.

महाराष्ट्रात तुम्हाला किती जागा मिळतील, असे विचारले असता चेन्निथला म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात १७ जागी उमेदवार दिले आहेत. यातील प्रत्येक जागा विजयाच्या जवळ आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २१ जागी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागी उमेदवार उभे केले आहेत. तिन्ही पक्षांमध्ये एकोपा आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आले. मुंबई उत्तर मतदारसंघात भूषण पाटील यांच्यासाठी ठाकरे, विनोद घोसाळकर प्रचारासाठी उतरले आहेत. वर्षा गायकवाड यांना मी मतदान करणार, असेही त्यांनी सांगितले आहे. आमचे लोक ठाकरे, शरद पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, हा एकोपा आमच्या विजयाचा मुख्य आत्मा आहे, असेही चेन्निथला यांनी सांगितले.

शरद पवारांचा या वयात ज्या पद्धतीने उल्लेख केला गेला किंवा अजित पवार गटाकडून बारामतीमध्ये मडके फोडण्यात आले, ही गोष्ट महाराष्ट्रातल्या संवेदनशील जनतेला आवडलेली नाही. या गोष्टींचा राग ते आपल्या मतदानातून दाखवून देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती दाखविली, याचा अर्थ भाजप ठाकरे यांच्याशी जुळवून घेईल का? असा थेट सवाल विचारला असता, चेन्निथला म्हणाले, याचा अर्थ, भाजपला महाराष्ट्रात त्यांचा पराभव दिसत आहे. कोणतीही खिडकी, दरवाजे उघडे केलेले नाहीत. त्यामुळे त्यातून आता कोणीही येणार जाणार नाहीत. 

मुंबईत तुम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. मात्र, तुमचे नेते एकदिलाने काम करताना दिसत नाहीत त्याचे काय?  उद्या सगळ्यांची एकत्रित मीटिंग आपण बोलावली आहे. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेण्याची काँग्रेसची वेगळी यंत्रणा आहे. कोण काय काम करत आहे, यावर आमचे बारीक लक्ष आहे. वर्षा गायकवाड यांनाही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझे एवढे सांगणे सगळ्यांना पुरेसे ठरेल, असे मला वाटते.

तुमचे महाराष्ट्रातील नेते विजय वडेट्टीवार यांनी सेल्फ गोल केला, त्याचे काय?  ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. निवडणुकीच्या काळात नेते बोलत असतात. मात्र, भाजपने लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले. हिंदू-मुस्लीम राजकारण ऐकून लोक थकून गेले आहेत. यापेक्षा महाग झालेला सिलिंडर स्वस्त कसा मिळेल, याची चिंता लोकांना आहे. भारत-पाकिस्तान म्हणत या निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत-पाकिस्तान म्हणायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? 

टॅग्स :congressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४