उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 07:40 PM2019-10-16T19:40:42+5:302019-10-16T19:44:35+5:30

उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

Maharashtra Election 2019: Ajit Pawar hits back at Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

Next
ठळक मुद्देदहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच प्रमुख नेत्यांच्या झंझावाती सभा सुरू आहेत आणि त्यांच्यात वाक् युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतंय. दहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही त्यावरून नुकतीच शाब्दिक चकमक उडाली. पण, दोघांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं. उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

माझ्या राजकीय कारकिर्दीतील 'ते' अतिशय चुकीचं विधान होतं. त्याबद्दल मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. एखादी गोष्ट चुकल्यावर, त्याबद्दल माफी मागितल्यावर तो विषय काढत नाहीत ना आपल्याकडे. पण, ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरत नाही का तेच कळत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. तुझे वडीलच सांगत होते, 'वाजवा पुंगी, हटवा लुंगी' आणि आज चिरंजीव लुंगी घालून प्रचार करत आहेत. आमची २५ वर्षं युतीत सडली, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून लोकांसमोर गेलेत, असा टोलाही त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत लगावला. कुठलीच कामं केली नसल्यानं जुने मुद्दे उकरून काढायचे हे पोरकट राजकारण शिवसेना करत असल्याचं त्यांनी सुनावलं. 

सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची शरद पवार यांनी बार्शीतील सभेत खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला होता. त्यानंतर, बार्शीतल्याच सभेत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको, असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांवर बाण सोडला होता. 

Web Title: Maharashtra Election 2019: Ajit Pawar hits back at Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.