शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Maharashtra Election 2019: अमृता फडणवीसांकडून राज ठाकरेंची खिल्ली तर उद्धव ठाकरेंना 'ही' उपमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 9:26 PM

Maharashtra Election 2019: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. यापूर्वी अंग्रिया क्रुझच्या उद्घाटनप्रसंगी सेल्फी काढलेला अमृता फडणवीस यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपूर्वी अमृता यांच्या गाण्याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनसेचं गाणं गाताना व्हिडिओत त्या दिसत होत्या. पण, तो एडिट करुन फेक व्हिडिओ बनविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करुन राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर अमृता यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस चक्क मुख्यमंत्र्यांसमोर मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ आहे. मनसे आणि भाजपा हे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. 

अमृता फडणवीस यांना एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये, राज ठाकरेंबद्दल एका वाक्यात काय सांगाल असे विचारण्यात आले. त्यावर, त्यांना हे वाईट वाटेल, पण विचारलंय म्हणून सांगते... एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट... असे अमृता यांनी म्हटलंय. तर, उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना 'बडे भैय्या', असं त्या म्हणाल्या. शरद पवारांबद्दल बोलताना, मला त्यांचा खूप आदर आहे. या वयातही ते ज्या पद्धतीने पळतात ते पाहून मी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन.... अभी तो मै जवान हूँ... असे अमृता यांनी म्हटले आहे. तसेच, पती देवेंद्र यांच्याबद्दल सांगताना, घरातून गायब असलेले मिस्टर इंडिया, असे विनोदी उत्तर त्यांनी दिले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे. भाजपाने रम्याचा डोस या काल्पनिक पात्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. कोहिनूर मिल कथित घोटाळ्यात ईडीची चौकशी झाल्याचा उल्लेख करत भाजपाने राज ठाकरेंना कोट्याधीश जादूगर अशी उपमा दिली होती. तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही पीएमसी बँकेबाबत सामान्यांना त्रास झाल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एक्सिस बँकेत खातं उघडावं, आपली बँक, वहिनीची बँक असं म्हणत भाजपावर पलटवार केला आहे.  

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019