मुंबई : भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या तीन उमेदवार याद्या मिळून १४ विद्यमान आमदारांना घरी बसविले असून चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हे आजी -माजी मंत्री वेटिंगवर आहेत.उद्गीरचे आमदार सुधाकर भालेराव यांना डावलून डॉ.अनिल कांबळे यांना संधी दिली. बीड जिल्ह्यातील केजमध्ये विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली. नमिता या राष्ट्रवादीच्या नेत्या दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्रुषा आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नमिता यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. मात्र, नमिता यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला. उद्गीरमधून संधी नाकारण्यात आलेले सुधाकर भालेराव हे दुसऱ्यांदा आमदार आहेत. २००९ मध्ये मराठवाड्यात भाजपच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या, त्यात भालेराव एक होते. आज जाहीर झालेल्या तिस-या यादीत भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्याऐवजी विधान परिषदेचे सदस्य असलेले राज्यमंत्री परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे.पहिल्या व दुसºया यादीतून यांना डच्चूउदेसिंह पाडवी, शहादा । सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर । राजू तोडसाम, आर्णी । मेधा कुलकर्णी, कोथरूड । दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट । विजय काळे, शिवाजी नगर । आर.टी.देशमुख, माजलगाव । सरदार तारासिंह, मुलुंड । विष्णू सावरा, विक्रमगड । संगीता ठोंबरे, केज । सुधाकर भालेराव, उद्गीर। राजेंद्र नजरधने, उमरखेड । बाळा काशीवार, साकोली । प्रभूदास भिलावेकर, मेळघाट
Maharashtra Election 2019 : भाजपच्या तीन याद्यांमध्ये १४ आमदारांचा पत्ता कापला, चार आजी-माजी मंत्री वेटिंगवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 4:43 AM