भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं तिकीट कापण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिल्यानंतर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचं तिकीट चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळेंना संधी देण्यात आली आहे.भाजपानं उमेदवारी यादी जाहीर करताना अनेक धक्के दिले आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकट्या चंद्रकांत पाटील यांचा अपवाद वगळता इतर सर्व बड्या नेत्यांचे पत्ते कापण्यात आले आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे मुक्ताईनगरमधून निवडणूक उत्सुक होते. मात्र पहिल्या तीन याद्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. अखेर चौथ्या यादीत खडसेंच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. बावनकुळे, खडसे यांच्यासोबतच उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडेंचंदेखील तिकीट कापण्यात आलं. तावडे बोरिवली मतदारसंघातून निवडून आले होते. भाजपानं चौथ्या यादीत तावडेंऐवजी सुनील राणे यांना संधी दिली. सुनील राणे हे 1995 ते 1999 या काळात युती सरकार मधील दिवंगत शिक्षण मंत्री दत्ता राणे यांचे सुपुत्र आहे. 1995 च्या विधानसभा मतदार संघात दत्ता राणे यांनी झुंजार कामगार नेते दिवंगत दत्ता सामंत यांचा पराभव केला होता. सुनील राणे हे मुंबई भाजपाचे सरचिटणीस आहेत. 2014 साली अखेरच्या क्षणी युती तुटल्यावर सुनील राणे यांना भाजपाने वरळी विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. मात्र आमदार सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता.
Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:46 PM