शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Maharashtra Election 2019 : विनोद तावडे, बावनकुळे या मंत्र्यांसह १८ आमदारांना भाजपने दिला नारळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:45 AM

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनी राजकारण ढवळून निघाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनी राजकारण ढवळून निघाले. माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकीट कापल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये राडा करत भाजप उमेदवार पराग शहा यांची गाडी फोडली. बोरीवली मतदारसंघात विनोद तावडे यांचा पत्ता कट करून भाजपने सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चिडलेल्या तावडे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली.राज पुरोहित यांचाही पत्ता कापल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आमदार तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याच विरोधात बंडखोरी केल्याने खळबळ उडाली. भांडुपमध्ये पुन्हा संधी मिळावी, म्हणून रात्रभर ‘मातोश्री’समोर धरणे धरलेल्या अशोक पाटील यांना भेटण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आणि समर्थकासंह पोलिसांनी त्यांची धरपकड केल्याने बाळासाहेबांची शिवसेना आता उरली नाही, अशी कडवट टीका करत त्यांनी अस्वस्थतेला तोंड फोडले.कणकवलीत नीतेश राणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाआहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान११८ आमदारांपैकी २० आमदारांचे तिकीट कापले. त्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीविनोद तावडे आणि ऊर्जा व उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या दिग्गजांचे तिकीट कापून भाजप पक्षश्रेष्ठींनी आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने ऐनवेळी काही ठिकाणचे उमेदवार बदलले. नंदूरबारमध्ये मोहन पवनसिंग यांच्याऐवजी भाजपचे आमदार उदेसिंह पाडवी, सिल्लोडमध्ये प्रभाकर पालोदकर यांच्याऐवजी कैसर आझाद तर नाशिक मध्य मतदारसंघात शाहू खैरेऐवजी हेमलता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ या दिग्गजांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.बहुसंख्य मतदारसंघात तिकीट कापले गेलेल्या नाराजांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या ७ तारखेपर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.सोलापूर जिल्ह्यातआघाडीत बिघाडीसोलापूर जिल्ह्यातील काँगे्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ऐन निवडणुकीत बिघाडी निर्माण झाली आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले आहे, तर या खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्टÑवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे.भाजपच्या या आमदारांचा पत्ता कटलाउदेसिंह पाडवी, शहादा । सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर । राजू तोडसाम, आर्णी ।मेधा कुलकर्णी, कोथरूड । दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट । विजय काळे, शिवाजीनगर। आर.टी. देशमुख, माजलगाव । सरदार तारासिंग, मुलुंड । विष्णू सावरा, विक्रमगड ।संगीता ठोंबरे, केज । सुधाकर भालेराव, उद्गीर । राजेंद्र नजरधने, उमरखेड ।बाळा काशीवार, साकोली । एकनाथ खडसे, मुक्ताईनगर । चंद्रशेखर बावनकुळे, कामठी । चरण वाघमारे, तुमसर । बाळासाहेब सानप, नाशिक पूर्व । विनोद तावडे, बोरीवली ।राज पुरोहित, कुलाबा। प्रभुदास भिलावेकर, मेळघाटअवघ्या पाच मिनिटांमुळे सुप्रिया गावीत उमेदवारीपासून वंचितअक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार डॉ. सुप्रिया गावीत या निर्धारित वेळेनंतर ५ मिनिटे उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही.कामठीमध्ये ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामानागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पॉलिटिकल ड्रामा झाला. बावनकुळे यांचे पाचव्या यादीतही नाव नसल्याने कामठीत उमेदवारी कुणाला यावर तर्कवितर्क सुरू असतानाच, बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांना ‘ए/बी’ फार्म देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, ऐन वेळी माजी जि. प. अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जि.प.सदस्य अनिल निधान यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यानंतर, भाजप नेते आनंदराव राऊत तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. या नाट्यानंतर सायंकाळी ५ वाजता भाजपने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यात टेकचंद सावरकर यांचे नाव होते. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सायंकाळी ४.३० वाजतानंतर बावनकुळे यांच्या समर्थकांनी कोराडी येथील त्यांच्या निवासस्थानापुढे ठिय्या मांडला. भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारून अन्याय केल्याची संतप्त भूमिका त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा