शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 1:28 PM

Maharashtra Election 2019 सर्वाधिक श्रीमंत उमेदवार भाजपाचे; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या श्रीमंतीची चर्चा होते. यंदाची निवडणूकदेखील त्याला अपवाद नाही. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले १००७ उमेदवार कोट्यधीश आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपा सर्वाधिक १६४ जागा लढवत आहे. यापैकी १५५ उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा एक कोटीहून अधिक आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून लढणारे पराग शहा राज्यातले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे तब्बल ५०० कोटींची संपत्ती आहे. भाजपानं प्रकाश मेहता यांचं तिकीट कापून शहांना संधी दिली आहे. राज्यातले दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत उमेदवारदेखील भाजपाचेच आहेत. मलबार हिल मतदारसंघातून लढणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती ४४१ कोटी रुपये आहे.श्रीमंत उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे संजय जगताप तिसऱ्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती २४५ कोटी आहे. ते पुरंदरमधून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. जगताप यांच्यासह काँग्रेसचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. काँग्रेस यंदा १४७ जागांवर लढत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या तुलनेत अधिक जागा लढवत असलेल्या भाजपाचे १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यंदा भाजपा १६४ जागा लढवत आहे. शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Mehtaप्रकाश मेहताMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा