मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच वाढत चालला असून पुढील ४८ तासांत अनेक घडामोडी राज्यात घडतील असं चित्र दिसत आहे. निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. भाजपाने राज्यात १०५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र भाजपाने सत्ता स्थापनेसाठी हालचाल केली नाही.
महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात सत्ता स्थापनेची बोलणीही सुरु झाली नाही. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत असून अपक्षांना सोबत घेण्याची स्पर्धा शिवसेना-भाजपात लागली आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्यात नवीन सरकार येईल असं विधान केलं मात्र यामध्ये महायुतीचा उल्लेख टाळला. भाजपा आणखी काळ वाट बघण्याची मानसिकतेत आहे. मात्र विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट येईल असं भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं आहे.
विधीमंडळ बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया सुरु होईल. पुढील ६ महिने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर विरोधी पक्षाचे आमदार फुटण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपा अल्पमतात सरकार स्थापन करणार नाही असं सांगितले जात आहे. भाजपामध्येही सत्तास्थापनेवरुन मतप्रवाह आहेत. २०१४ प्रमाणे राज्यात भाजपाने सत्ता स्थापन करावी त्यानंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊ शकेल असं काही नेत्यांना वाटतं मात्र २०१४ ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत आकड्यांची तफावत मोठी असल्याने फोडाफोडीचं राजकारण करणं शक्य नाही. त्यामुळे भाजपा सध्या वेट अॅन्ड वॉच या भूमिकेत असल्याने येणाऱ्या काळात शिवसेना-भाजपा काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'
'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'
मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... नव्या चर्चेला जोर
'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'
'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह'
...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका?