मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सत्ता स्थापन न झाल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र यानंतर महायुतीमधील दोन मोठे पक्ष असलेल्या शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपांवरुन निर्माण झालेला संघर्ष टोकाला गेला. अखेर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी केल्यानं महायुतीमधील दरी रुंदावली. शिवसेना भाजपापासून दूर गेल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. यानंतर भाजपानं सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केलं. ही घोषणा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:10 PM