महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 10:58 AM2019-11-05T10:58:14+5:302019-11-05T10:59:05+5:30
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला
मुंबई - राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भेटीगाठींचे सत्र सुरु आहे. अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येत सरकार स्थापन करणार की राज्यात नवीन समीकरण उदयास येणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला मात्र यावेळी त्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याने समोर आलं. तत्पूर्वी राज्याची विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार आलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान भाजपा मंत्र्याने केलं होतं. त्यामुळे जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर आमदार फुटण्याची भीती निर्माण होऊ शकते. पुढील ६ महिन्यात भाजपा सर्वोतोपरी विरोधी पक्षाचे आमदार पक्षात घेण्याची रणनीती आखू शकते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असा पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, राज्याचा राजकीय चेहरा बदलला जाणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सांगितले की, अद्याप शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा आम्ही त्यांना प्रस्ताव पाठविला नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करता येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सरकार स्थापन करतील याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यातील राजकारणासाठी महत्वाचे आहेत.
महत्वाच्या बातम्या
'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'
मुख्यमंत्री शिवसेनेचा, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा?; फॉर्म्युला 95चाच, पण... नव्या चर्चेला जोर
'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'
'ही तर बौद्धिक दिवाळखोरी; दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह'
...म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावं तेवढे थोडेच; शिवसेनेने घेतली मवाळ भूमिका?