यदू जोशी
मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीमध्ये निवडणूक लढवित असले तरी कणकवलीत मात्र भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष वाढला आहे. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीहीकणकवलीत सभा घेत नारायण राणेंचा समाचार घेतला.
नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाला आहे. त्यामुळे कोकणात भाजपा वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राणे कुटुंबीयांना बळ दिल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला राणे यांनीही जशास तसे उत्तर दिलं आहे. निवडणुकीनंतर मातोश्रीबाहेर सभा घेऊन उद्धव ठाकरेंवर प्रहार करणार असल्याची घोषणा राणेंनी केली. त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निवडणुकीनंतरही पाहायला मिळणार आहे.
मात्र मुख्यमंत्र्यानी राणे-शिवसेना संघर्षावर लोकमतच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. शिवसेना-राणेंमध्ये मध्यस्थी करणार असल्याचं त्यांनी सांगितले. राणेंना भाजपत घेतल्यानंतर चोरांपासून सावध राहण्याचा सल्ला आपल्याला उद्धव ठाकरेंनी दिलाय. शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात निवडणुकीनंतर मध्यस्थी करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर मला कधीकधी आगाऊपणा करण्याची सवय आहे. त्यामुळे मी मध्यस्थी करू शकतो. कटूता संपावी असं मला वाटतं असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच तेल रिफायनरी नाणारमध्येच होईल का? यावर मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी कोकणातच होईल. ती कुठे होणार या बाबतचा निर्णय मी एक महिन्याच्या आत जाहीर करेन. जिथे मेजॉरिटी लोकांचा पाठिंबा आहे तिथे हा प्रकल्प होईल असं सांगितल्यामुळे रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणारमध्ये होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
जातीच्या राजकारणाचा आपल्याला त्रास झाला?राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मला सर्व जातीधर्मांच्या लोकांनी स्वीकारले. जात ही जनतेच्या मनात नसते ती राजकारण्यांच्या मनात असते. लोकांच्या मनात जात असती तर राज्यात आरक्षणावरून मोठे आंदोलन सुरू असताना आम्ही सगळ्या निवडणुका जिंकलोच नसतो. राजकीय नेते जातीची ढाल मतलबासाठी वापरतात. आरक्षणाचा टक्का वाढल्याने राज्यातील काही समाजांमध्ये अन्यायाची भावना आहेच. ती निश्चितपणे दूर केली जाईल आणि त्यासाठी २०१८ पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या बहाल केल्या जातील आणि त्या वेळोवेळी वाढविल्या जातील.
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला
''राज्य बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध''
सावरकरांना 100 टक्के भारतरत्न मिळणार, त्यांना सन्मान देण्याची हीच योग्य वेळ- गडकरी
फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...
शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त