मुक्ताईनगर (जळगाव): मुक्ताईनगरमधून तुमच्याऐवजी अन्य एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवा, असे पक्षाने मला सांगितले आहे. मात्र, कोणा एकाचे नाव सुचविणे माझ्यासाठी शक्य नाही. कारण, माझ्यासाठी सगळेच एकनाथ खडसे आहेत, असे सांगतानाच, 'इतर कोणाऐवजी मी का नको हे पक्षाने मला सांगावे,' अशी संतप्त भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या तिन्ही उमेदवार याद्यांमधून खडसे यांचे नाव वगळल्ले आहे. त्यामुळे खडसे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत असून अपक्ष लढण्यासाठी खडसेंवर दबाव टाकत आहेत.या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी खडसे यांनी गुरुवारी मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. खडसे यांनी या सर्वांना संयम राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपण सगळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आतापर्यंत पक्षाने जो आदेश दिला, त्यचेआम्ही पालन केले. मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगताच एका मिनिटात देऊन टाकला. आता तिकीट नाकारलं आहे. कदाचित पक्षाला अधिक चांगला उमेदवार सापडला असावा. अन्य उमेदवार चालत असेल तर मी का नको, एवढंच पक्षानं मला सांगावं,' अशी अपेक्षाही खडसे यांनी व्यक्त केली.खडसेंवर अन्यायच - भुजबळनाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी देणे टाळून त्यांचा पक्ष त्यांच्यावर अन्याय करीत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. खडसे हे आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचेदेखील ते म्हणाले.खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात - शरद पवारठाणे- सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पयार्याच्या शोधात असतो. खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार ठाण्यात आले होते.
Maharashtra Election 2019 : मी का नको ते अगोदर सांगा, खडसेंची संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 4:36 AM