शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भाजपाने 'लिंबू फिरवलं'; आता विरोधक पुन्हा 'झपाटणार' की नवी 'करणी' करणार? 

By अमेय गोगटे | Published: October 10, 2019 2:57 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय.

ठळक मुद्देमूळ मुद्द्यांपासून विरोधकांना भरकटवण्याची खेळी भाजपा करत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय.विरोधी पक्षाच्या 'सायबर आर्मी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे.

>> अमेय गोगटे

काँग्रेसचे एक तरुण-तडफदार नेते नुकतेच भेटले. राज्यातलं वातावरण कसं वाटतंय, या प्रश्नावर 'वातावरण बदलतंय' म्हणाले. त्याचा फायदा तुम्ही कसा करून घेणार, काय स्ट्रॅटेजी आहे, असं विचारताच ते एकदम मुद्द्याचं बोलले. 'मुद्दे धरून प्रचार करणं आवश्यक आहे', असं मत त्यांनी मांडलं आणि ते अत्यंत अचूक म्हणावं लागेल. कारण, गेल्या काही वर्षांतील निवडणुकांच्या प्रचारात भाजपाने एक वेगळाच 'अजेंडा' सेट केल्याचं आणि विरोधक त्याभोवतीच पिंगा घालत राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. थोडक्यात, मूळ मुद्द्यांपासून विरोधकांना भरकटवण्याची खेळी भाजपाने केली आणि ते त्यात यशस्वीही झालेत. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार 'लिंबू' या बहुगुणी फळाभोवती केंद्रीत झाल्याचं पाहायला मिळतंय.

लोकसभा निवडणुकीत राफेल घोटाळ्याचा मुद्दा घेऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वातावरण तापवलं होतं. 'चौकीदार चोर है'चा नारा देशभरात पोहोचत होता. राफेलचा विषय जनसामान्यांना भिडणारा होता का, हा मुद्दा वेगळा; पण या मुद्द्यावर फोकस करून बेरोजगारी, महागाईचा मुद्दाही विरोधक मांडत होते. दुसऱ्या बाजूला, मोदी सरकार एअर स्ट्राईक आणि प्रखर देशभक्ती या दोन अस्त्रांचा प्रभावी वापर करत होतं. अशातच, माजी पंतप्रधान राजीव गांधींनी INS विराट या युद्धनौकेचा मनोरंजनासाठी वापर केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत नेते पुढचे काही दिवस तो एकच मुद्दा घेऊन बसले.  

त्यानंतर, अभिनेता अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेणं, त्यातील प्रश्नांचं स्वरूप, अक्षय कुमारचं नागरिकत्व, मोदींचा स्टंट या चर्चांनी सोशल मीडिया ढवळून निघाला. त्यात पुन्हा राफेल, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे बाजूला पडले. आता महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात राफेलच्या चाकाखाली ठेवलेलं लिंबू चर्चेत आलं आहे.  

दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्याची आपली प्रथा आहे. हे औचित्य साधून गेल्या शनिवारी - विजयादशमीला भारतीय वायुसेनेत बहुचर्चित राफेल विमान दाखल झालं. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सला जाऊन राफेलची पूजा केल्याचे फोटो प्रसिद्ध झालेत. त्यावेळी राफेलच्या चाकांखाली लिंबू ठेवल्याचं दिसतंय आणि तोच वादाचा विषय ठरला आहे. राफेल विमानासारखं आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेलं अस्त्र आणताना ही अंधश्रद्धा कशासाठी?, असा प्रश्न विचारला जातोय. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीची नेतेमंडळी त्यावरून भाजपाची खिल्ली उडवताहेत. सोशल मीडियावर जोक्सचा पूर आला आहे.  

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवणे लाजिरवाणे : अंनिसची कडाडून टीका 

विरोधी पक्षाच्या 'सायबर आर्मी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यावेळी लिंबू-मिरची लावणाऱ्यांना मोदी हसले होते.

Video: कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना मोदी काय म्हणाले होते?; पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर, राफेल पूजनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर म्हणून भाजपाच्या समर्थकांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी केलेल्या जहाज पूजनाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केलीय. त्यामुळे आणखी काही दिवस हा विषय चर्चेत राहू शकतो किंवा तो तसा ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असावा. कारण, हिंदुत्व हा मोदी सरकारचा, भाजपाचा 'अजेंडा' आहे. राफेलची कुंकू लावून केलेली पूजा, त्यावर काढलेला 'ओम' हे हिंदुत्वाचं द्योतक असल्याने ते जनमानसात पोहोचावं, असं भाजपाला वाटतच असणार. त्यामुळे आता विरोधकांची खरी कसोटी असेल.

लोकसभा निवडणुकीवेळी झालेली चूक विरोधक पुन्हा करतात का, लिंबावरून सुरू असलेल्या चर्चेतच ते अडकून पडतात का, 'भाजपाने फिरवलेल्या' लिंबाने 'झपाटले' जातात का, त्यात किती वेळ घालवतात, यावर बरंच काही ठरू शकतं. या लिंबाचा उतारा म्हणून त्यांना यावेळी आधीपेक्षा वेगळी 'करणी' अर्थात कृती करणं, म्हणजेच काँग्रेसच्या तरुण नेत्याने म्हटल्याप्रमाणे मुद्द्यांना धरूनच प्रचार करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा हे लिंबू तोंड आंबटही करू शकतं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rafale Dealराफेल डीलRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा