महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असं विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. जम्मू- काश्मीरमधील नागरिक देखील भारतीयचं असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अकोल्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आहे. देशहिताच्या मुद्द्यावर तरी किमान सगळ्याच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे आम्ही विरोधकाना विनंती केली, मात्र ही लोक मानायला तयार नाही. सीमारेषेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश जम्मू- काश्मीरसोबत आहे. आपल्या देशाला कोणतीही जखम होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधील कलम 370चा महाराष्ट्राचा काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेने विरोधकाना संदेश दिलाय, मात्र विरोधकांना कळत नाही. तीनवेळा मराठवाड्यातून मुख्यमंत्री झाले होते. मात्र अजूनही मराठवाड्याला पायाभूत सुविधा मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षा शेवटचा श्वास घेत असून राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं वाजले असून दोन्ही पक्ष फक्त 20 जागा जिंकणार असल्याचा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.