शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

Maharashtra Election 2019: चंपानंतर राज ठाकरेंच्या सभेत 'टरबूज'; उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 9:45 PM

राज ठाकरे यांच्या प्रश्नांनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा 

नाशिक: निवडणुकीत चंपाची चंपी करणार असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. यानंतर आता राज यांनी नाशिकमधील सभेत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आजकाल काही पुरुषदेखील गर्भवती असल्यासारखं वाटतात, असं राज यांनी म्हटलं. यावेळी राज यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र राज यांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० चा राज्यातील निवडणुकीशी संबंध काय, असा प्रश्न उपस्थित करत राज यांनी सत्ताधाऱ्यांना राज्यासमोरील प्रश्नांवर बोलण्याचं आव्हान दिलं. 'शेतकरी मरतात, कामगार मरतात, युवकांना रोजगार नाही. तरी यांना काहीच वाटत नाही. निवडणुकीत नुसती मजा सुरू आहे. पण मी असा राहू शकत नाही. कारण बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हीच माझ्या कामाची पद्धत आहे,' असं राज ठाकरे म्हणाले.या जगात सगळं काही होऊ शकतं. काहीच अशक्य नाही. पुरुष गर्भवती राहू शकत नाही याशिवाय या जगात अशक्य काहीच नाही, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर पुढे बोलताना आजकाल काही माणसंदेखील गरोदर असल्यासारखी दिसतात, ही गोष्ट वेगळी, असं राज यांनी म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी राज काही वेळ शांत उभे राहिले. यानंतर माझ्या वाक्यानंतर तुम्हाला कोण दिसलं मला माहीत नाही.. जो कोण तुम्हाला दिसला असेल त्यात आनंद घ्या, असं राज यांनी म्हटलं. यानंतर गर्दीतून काही शब्द ऐकू येऊ लागले. त्यांना प्रतिसाद देत जॅकेट म्हणजे कोण, कोट आणि टरबूज म्हणजे कोण, असे प्रश्न राज यांनी विचारताच पुन्हा उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस