वर्धा: हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी 18 उमेदवार रांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन 17 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे.
विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यत 18 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदीले यांनी उमेदवारी अर्जा सोबत नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे संबंधित बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे निदर्शनास आणून शनिवारी अर्जाचे छाननी पूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जाचे छाननी पर्यंत अतुल वांदीले यांनी नोटरी केलेले शपथ पत्र सादर केले नाही. त्यामुळे वांदीले यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांनी दिली.
आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या 17 उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष एडवोकेट सुधीर कोठारी, बसप चे विलास नानाजी टेम्भरे, संभाजी ब्रिगेड चे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे डॉ उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे दमडु वारलू मडावी, लोकजागर पार्टीचे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. आज छाननी नंतर एकूण 17 उमेदवार मैदानात आहे.येत्या 7 तारखेला उमेदवारी अर्ज वापस घेण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.