Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:15 PM2019-10-19T13:15:32+5:302019-10-19T13:18:24+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election: तब्बल ४५३ उमेदवारांची संपत्ती ५ कोटीपेक्षा जास्त

Maharashtra Election 2019 more than 1000 candidates are Millionaire including congress ncp shiv sena ncp | Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

googlenewsNext

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. सोमवारी संपूर्ण राज्य आपला आमदार, नवं सरकार निवडण्यासाठी मतदान करेल. प्रचारादरम्यान, मतदानावेळी उमेदवारांच्या कार्यक्षमतेइतकीच त्यांच्या संपत्तीचीदेखील चर्चा होते. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या मालमत्तेचा तपशील पाहिल्यास तब्बल ३२ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत.

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या १००७ उमेदवारांची संपत्ती १ कोटीपेक्षा अधिक आहे. ५ कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ४५३ इतकी आहे. म्हणजेच यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ टक्के उमेदवारांची संपत्ती ५ कोटीहून अधिक आहे. आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १० टक्के म्हणजेच ३०४ उमेदवारांची संपत्ती २ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे. तर ५० लाख ते २ कोटी संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ५४० इतकी आहे. 

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा आकडा १० ते ५० लाखांदरम्यान असल्याचं सांगणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण ६८० इतकं आहे. म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी २२ टक्के उमेदवारांची संपत्ती १० ते ५० लाखांदरम्यान आहे. तर १० लाखांहून कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या ११३५ इतकी आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३६ टक्के उमेदवारांची संपत्ती १० लाखांपेक्षा कमी आहे. 

सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत. भाजपा यंदा १६४ जागा लढवत आहेत. त्यापैकी १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. महाआघाडीतील काँग्रेस १४७ जागांवर लढत आहे. त्यांचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या होत्या. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत. 
 

Web Title: Maharashtra Election 2019 more than 1000 candidates are Millionaire including congress ncp shiv sena ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.