मुंबई: उदयनराजेंना विरोध नाही पण भाजपा सरकारच्या काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या त्यामुळे भाजपाला विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगतिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, देशात चीनचे राष्ट्रध्यक्ष चेन्नईतील महाबलिपुरममध्ये आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाक्षिणात्य लुंगी घालून त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा धोतर का नेसत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणतात अब की बार 220 पार मात्र अब की बार 220 पार नाही तर अब की बार तुम्ही सत्तेच्या बाहरअसं म्हणत अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अमोल कोल्हे आज साताऱ्याच्या प्रचारसभेत बोलत होते.
दिवाळी सुखानं साजरी करायची असेल तर भाजपचे दिवाळं काढाण्याची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलिस भरती, शिक्षक भरती, सरकारी नोकरीच्या किती संधी या सरकारने पाच वर्षांत उपलब्ध करुन दिल्या? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झाले? असा प्रश्न देखील अमोल कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला.