मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. यानंतर त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. आमदार १४५ व्हावेत यासाठी प्रयत्न असतील. सत्तास्थापनेसाठी विलंब होणं अयोग्य. फडणवीस यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे राणे म्हणाले.
सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करेन. ही माहिती देणं बरोबर वाटत नाही. येणारे आमदारही थांबतील. शिवसेना त्या दोघांबरोबर जाऊ शकेल असं वाटत नाही. शिवसेनेला आमदारांना डांबून ठेवावे लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.
साम दाम दंड भेद हे शिवसेनेचंच आहे, असं जे बोलले ते हॉस्पिटलमध्ये आहेत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. एवढी वर्षे राजकारण करतात, असा टोलाही राणे यांनी लगावला.
शिवसेना नैतिकतेला धरून वागली नाही. महायुतीमध्ये बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. ते शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. युती म्हणजे वचन असते ते शिवसेनेने पाळले नाही, असा आरोपही राणे यांनी केला.