शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या भर पावसातील सभेवर सुप्रिया सुळे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 4:57 PM

Maharashtra Election 2019 पवारांच्या सभेचं सोशल मीडियाकडून जोरदार कौतुक

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पायाला दुखापत होऊनही पवारांनी दाखवलेल्या जिद्दीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. काल रात्रीपासून पवार ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहेत. पावसाची संततधार सुरू असूनही पवारांनी केलेल्या भाषणांचं अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. पवारांच्या पावसातल्या भाषणाची राष्ट्रीय माध्यमांनीदेखील दखल घेतली. #SharadPawar रात्रीपासून ट्विटरवर ट्रेंडमध्ये पाहायला मिळाला. विशेष म्हणजे बराच वेळ हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर होता. पवारांच्या या आक्रमक भाषणाची त्यांची कन्या सुप्रिया सुळेंनी प्रशंसा केली आहे. 'साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय पवार साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,' असं सुप्रियांनी ट्विटमध्ये म्हटलं  आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील पवारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. 'मी म्हटलं होतं, 'हवा बदलतेय'! याची प्रचिती आता सर्वांनाच आली. कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्येही आदरणीय पवार साहेबांनी सातारकरांना संबोधित केलं. उसळलेल्या अलोट जनसागरानं तितक्याच आत्मीयतेनं साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला. असलं ऊर्जावान नेतृत्व आम्हाला लाभलं, हे आमचं भाग्यच!', अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी पवारांच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.  शरद पवारांनी त्यांच्या कालच्या भाषणात उदयनराजेंचा समाचार घेतला. आम्ही लोकांनी साताऱ्यातील निवडणुकीत चूक केली होती. आम्हाला ती चूक दुरूस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरूस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरात वाट पाहात आहे. 21 तारखेला हा तरुणवर्ग निर्णय घेईल, असं म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष्य केलं. एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्या बाजूला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. पैलवान आणि कुस्ती हे शब्द भाजपला शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. हा जिल्हा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा असल्याचं पवारांनी सांगितलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार