Maharashtra Election 2019 : कमजोर ‘पंजां’चे विखुरलेले सिंह..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:38 PM2019-10-18T12:38:34+5:302019-10-18T12:39:55+5:30

विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसची

Maharashtra Election 2019 : Scattered congress with weak 'leaders.. | Maharashtra Election 2019 : कमजोर ‘पंजां’चे विखुरलेले सिंह..

Maharashtra Election 2019 : कमजोर ‘पंजां’चे विखुरलेले सिंह..

Next

चित्रातील अशोकस्तंभावरील
सिंहांना पाहून ‘त्या’ सिंहांनीही
प्रेरणा घेत फोडली डरकाळी
दाखवू लागले 'पंजा'तली ताकद... 

बऱ्याच दिवसांनी शिकारीला
चार सिंह निघालेत हे पाहताच
जंगलात भयभीत वातावरण..
सगळे बसले घाबरून लपून
त्या सिंहांच्या ‘पंजां’त नव्हती
पूर्वीची ती ताकद, डरकाळीत 
नव्हती ती पूर्वीइतकी दहशत...
तरीही त्यांना घाबरायचे सर्व 
शिकारीची सवय सुटल्यानं
त्यांना शिकार करता येईना
पोकळ डरकाळ्या फोडत
ते नुसते पळू लागले सैरावैरा
म्होरक्या सिंहच सैरभैर होता
त्याला शिकार काही सापडेना
या सिंहांना सोडून तो दुसºया
ताकदवान कळपात गेला निघून 
उरलेले तिघे आणखीन बिथरले
ते विखुरले आणि शोधू लागले
आपापल्याच इलाख्यातली
फक्त स्वत:साठी स्वतंत्र शिकार... 
एक काळ असा होता, की
जंगलावर त्यांचंच राज्य होतं
त्यांच्या हाती लागत होती 
अगदी नियमित अलगद शिकार
जंगलातले सगळे नियम त्यांनी
बनवले.. नंतर त्यांनीच तोडले
आयत्या शिकारीच्या नादी लागून.
त्यांनी शिकार करणं दिलं सोडून
कळपानेच राहिलं तर शिकार
एकमेकांच्या मदतीनं करता येते
हेच तत्त्व ‘ते’ सिंह गेले विसरून
सगळी ताकद त्यांची गेली विरून
त्यांच्या कळपातले अनेक सिंह
गेलेत सोडून, काही चाललेत...
नव्या कळपात जरी मिळत 
नसलं पूर्वीचं स्थान अन् मानही...
अशोकस्तंभाच्या सिंहांचा चुकीचा
अर्थ लावत या सिंहांनी फिरवली
परस्परांकडे पाठ अन् शोधतायत
शिकार आपल्या
कमजोर 'पंजां'सह...

- अभय नरहर जोशी- 

Web Title: Maharashtra Election 2019 : Scattered congress with weak 'leaders..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.