चित्रातील अशोकस्तंभावरीलसिंहांना पाहून ‘त्या’ सिंहांनीहीप्रेरणा घेत फोडली डरकाळीदाखवू लागले 'पंजा'तली ताकद...
बऱ्याच दिवसांनी शिकारीलाचार सिंह निघालेत हे पाहताचजंगलात भयभीत वातावरण..सगळे बसले घाबरून लपूनत्या सिंहांच्या ‘पंजां’त नव्हतीपूर्वीची ती ताकद, डरकाळीत नव्हती ती पूर्वीइतकी दहशत...तरीही त्यांना घाबरायचे सर्व शिकारीची सवय सुटल्यानंत्यांना शिकार करता येईनापोकळ डरकाळ्या फोडतते नुसते पळू लागले सैरावैराम्होरक्या सिंहच सैरभैर होतात्याला शिकार काही सापडेनाया सिंहांना सोडून तो दुसºयाताकदवान कळपात गेला निघून उरलेले तिघे आणखीन बिथरलेते विखुरले आणि शोधू लागलेआपापल्याच इलाख्यातलीफक्त स्वत:साठी स्वतंत्र शिकार... एक काळ असा होता, कीजंगलावर त्यांचंच राज्य होतंत्यांच्या हाती लागत होती अगदी नियमित अलगद शिकारजंगलातले सगळे नियम त्यांनीबनवले.. नंतर त्यांनीच तोडलेआयत्या शिकारीच्या नादी लागून.त्यांनी शिकार करणं दिलं सोडूनकळपानेच राहिलं तर शिकारएकमेकांच्या मदतीनं करता येतेहेच तत्त्व ‘ते’ सिंह गेले विसरूनसगळी ताकद त्यांची गेली विरूनत्यांच्या कळपातले अनेक सिंहगेलेत सोडून, काही चाललेत...नव्या कळपात जरी मिळत नसलं पूर्वीचं स्थान अन् मानही...अशोकस्तंभाच्या सिंहांचा चुकीचाअर्थ लावत या सिंहांनी फिरवलीपरस्परांकडे पाठ अन् शोधतायतशिकार आपल्याकमजोर 'पंजां'सह...
- अभय नरहर जोशी-