मुंबई: राज्यात आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले असताना सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेत विरोधकांवर निशाणा साधत आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांकडून भाजपाला विरोध होताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगावमध्ये प्रचारसभा घेत महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली. मात्र पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात हॅशटॅगच्या माध्यमातून 'मोदी परत जा' असं म्हणत सोशल मीडियावर विरोध करण्यात येत आहे.
केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी आल्याने अनेकांना रोजगार गमवण्याची वेळ आली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. कोल्हापुरातील पूरस्थितीतही मोदी कुठे मदत करताना दिसत नाहीत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर मात्र ते प्रचाराला आले असून या प्रचारात देखील राज्यातील समस्यांवर न बोलता कलम 370वर जास्त भर देत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.