मुंबई: दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघत आहे. बुधवारचा दिवसही आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुण्यातील पहिल्याच प्रचार सभेवर मात्र पावसाचे पाणीच पडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेर, शिरपूर, शहादा, साक्री, सटाणा आणि चांदवड येथे सभा झाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर व नगर इथे सभा घेतल्या. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशिम, अकोला व जळगाव जिल्ह्यात सभा घेऊन प्रचाराचा बार उडविला.फडणवीस यांनी काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, विरोधक मैदान सोडून पळ काढत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी मैदान मोकळे आहे. निवडणूक सुरू असताना राहुल गांधी परदेशात निघून गेले आहेत. सुशीलकुमार शिंदे म्हणतात, आम्ही थकलो आहोत. याउलट आमचे पैलवान अंगाला तेल लावून तयार आहेत.उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात ७/१२ कोरा करण्याची घोषणा केली होती. त्यावर पवार म्हणाले की, आता ७/१२ कोरा करणार आहात, मग पाच वर्षांत काय केले? आज उद्योगधंदे, छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले, शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढत असताना भाजपचे नेते ३७० कलमाचे तुणतुणे वाजवित फिरत आहेत. या मंडळींना गावात फिरकू देऊ नका.विलीनीकरणाची चर्चा चुकीची - पवारकाँग्रेस आणि राष्टÑवादीच्या विलीनीकरणाची चर्चा चुकीची आहे. सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबद्दल बोलत असतील. राष्टÑवादीची भूमिका मांडू शकत नाहीत. पक्षाचा राष्टÑीय अध्यक्ष मी आहे. मला माझ्या पक्षाची स्थिती अधिक माहिती आहे, असे सांगत शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.शेतकऱ्यांना वर्षाला दहा हजारशेतकºयांचा सात बारा येत्या पाच वर्षांत कोरा करणार, त्यांच्या नावावर वर्षाला दहा हजार रुपये टाकणार, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. बेकार झाल्यानंतर विरोधकांना भूमिपुत्र आठवले आहेत. आता शरद पवारांसह सगळेच बेकार झाले आहेत. कुठे छत्रपती शिवाजी महाराज, कुठे बाजीप्रभू देशपांडे आणि कुठे हे! थोरात साहेब, तुमचा नेता बँकॉकला पोहोचला. तुम्हीदेखील घरी बसा, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:59 AM