शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

President Rule: राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय?; राज्यावर काय होतो परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:13 PM

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र सत्ता स्थापन करण्यात भाजपा, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलादेखील अपयश आलं आहे. सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचे राज्यावर अनेक परिणाम होतील. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याचे सर्वाधिकार राष्ट्रपतींकडे जातात. यानंतर विधिमंडळाचे काम संसद पाहते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणं गरजेचं असतं. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्या राज्यात सहा महिन्यांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू असते. हा कालावधी वाढवायचा झाल्यास परत संसदेची मंजुरी घेणं आवश्यक असतं. अशाप्रकारे दर सहा महिन्यांनी मान्यता मिळवून राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त तीन वर्षे लागू राहू शकते, अशी माहिती घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली. राष्ट्रपती राजवटीदरम्यान सत्तास्थापनेचा दावा करता येऊ शकतो. बहुमताचा आकडा दाखवून सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. सहा महिन्यात सत्ता स्थापन न झाल्यास पुन्हा निवडणुकांचा विचार होऊ शकतो. राज्यात सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते. राष्ट्रपती राजवटीचा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान जसे नागरिकांचे मूलभूत अधिकार संकुचित केले जातात, तसं राष्ट्रपती राजवटीत होत नाहीत. राष्ट्रपती राजवटीत मुख्य सचिव राज्यपालांच्या सल्ल्यानं निर्णय घेतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नसल्यानं राष्ट्रपती राजवटीत कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नाहीत. त्याचा परिणाम राज्यावर आणि प्रशासनावर होतो. यामुळे नैसर्गिक संकटं आल्यास मदत करण्यात अनेक अडचणी येतात. याशिवाय निर्णय घेण्यासाठी सरकारच अस्तित्वात नसल्यानं विकासकामांवर मोठा परिणाम होतो. 

राष्ट्रपती राजवट केव्हा, कशी?राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नसल्याची किंवा तसा चालवणं अशक्य असल्याची राष्ट्रपतींची खात्री होणं हा यासाठी मुख्य निकष आहे. नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर ज्याला बहुमताचा पाठिंबा आहे, असं लोकनियुक्त सरकार अधिकारावर आणणं ही राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणानं नवं सरकार स्थापन होऊ न शकणं हे राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालवता न येण्याचंच द्योतक ठरतं.

अशा वेळी राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवं सरकार स्थापन होईपर्यंत आधीच्या विधानसभेतील बहुमताच्या आधारे सत्तेवर आलेलं सरकार मुदत संपल्यानंतर सत्तेवर राहू शकत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPresident Ruleराष्ट्रपती राजवट