अनंत जाधव
सावंतवाडी : खासदार नारायण राणे यांनी माझ्या बाबतीत केलेली विधाने ही गंभीर आहेत. निवडणूक काळात अशी विधाने होऊ लागली तर पोलिस प्रशासनास यांची गंभीर दखल घ्यावीच लागेल यापूर्वी माझ्या जीवितास धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र घातले असून गरज असल्यास पुन्हा पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र पोलिसांकडे दिले जाईल अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिली ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ रमेश गावकर उपस्थित होते.
तेली म्हणाले, राणे यांनी सावंतवाडीत येऊन माझ्या बाबतीत जी काहि विधाने केली आहेत ती गंभीर आहेत एखाद्या ला रस्त्यावर बघून घेईन याला सोडणार नाही अशी व्यक्तिगत विधाने ही योग्य नाहीत निवडणूक आयोगाने यांची दखल घेणे गरजेचे होते शांत शहरात अशी विधाने म्हणजे आपण दहशतीत निवडणूका लढतो कि काय असे वाटू लागले आहे.
मी यापूर्वीच पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र दिले होते.त्यात माझ्या जीवितास धोका असल्याचेही स्पष्ट केले होते.पण गरज भासल्यास पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र दिले जाईल तसेच पोलीस प्रशासनाकडून स्वतःहून पोलिस संरक्षण दिले तर घेणार मात्र मी मागायला जाणार नाही.यापूर्वी मंत्री दीपक केसरकर दहशतवाद म्हणून ओरड मारत होते.मग आता राणेच्या अशा गंभीर विधानावर गप्प कसे काय बसू शकतात असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.