शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 07:52 PM2024-10-23T19:52:54+5:302024-10-23T19:54:53+5:30

उद्धव ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ती प्रशासकीय चूक असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. 

Maharashtra Election 2024- Error in Shiv Sena Uddhav Thackeray first list, candidate will change?; Sanjay Raut admitted fault in a press conference | शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल

शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यात मविआतील ३ प्रमुख पक्ष काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ८५-८५-८५ अशा जागा लढवणार आहे. २७० जागांवर तिन्ही पक्षात सहमती झाली असून उर्वरित १८ जागांबाबत मित्रपक्षांना सोडली जाईल. त्यांच्याशी उद्या सकाळपासून चर्चा होईल असं संजय राऊतांनी मविआच्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, ती चुकून आल्याचं राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरुस्त्या आहेत. ते कशाप्रकारे झालं, काय झालं, आमची प्रशासकीय चूक कशी काय होऊ शकली याबाबत आमचे अनिल देसाई आहेत ते या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहतात. पण उद्या आम्ही उद्या बसणार आहोत. त्यावर काही नव्याने चर्चा होतील असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील काही उमेदवार बदलले जाऊ शकतात असे संकेत राऊतांनी दिले आहेत.

तसेच २८८ जागांचा प्रश्न सुटला असं जेव्हा आम्ही सांगतोय, ते अत्यंत जबाबदारीने सांगतोय. १८ जागा मित्रपक्षाला दिल्या जातील. त्यात आमच्यातील कुणाचा दावा असला तर त्यातून काही मार्ग काढला जाईल. आमची जी यादी चुकून आली आहे, त्यात काही शेकापच्या जागा आहेत. त्यावर शेकापची चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादीकडे आहेत, त्या मित्रपक्षांशी संबंधित आहेत. काही काँग्रेसकडे एखादी दुसरी जागा आहे त्यावर चर्चा होईल असं संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, महाविकास आघाडीत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, आप या सर्वांना सामावून घेणारे आमचं जागावाटप पूर्ण झालं आहे. तिन्ही पक्ष ८५-८५-८५ अशा २७० जागा लढवणार आहोत. उर्वरित ज्या जागा आहेत ते आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी उद्या सकाळपासून चर्चा होईल. २८८ जागा महाविकास आघाडी ताकदीने लढून राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. 

पहिली यादी अंतिम नाही? 

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पहिल्या यादीबाबत पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या जागांवर जे काही दुरुस्ती असतील त्या करून उद्या स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.  
 

Web Title: Maharashtra Election 2024- Error in Shiv Sena Uddhav Thackeray first list, candidate will change?; Sanjay Raut admitted fault in a press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.