शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 4:08 PM

भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत १३ महिलांना स्थान देण्यात आलं आहे. त्यात खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपाने भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 

कोणत्या मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी?

चिखली - श्वेता विद्याधर महालेभोकर -श्रीजया अशोक चव्हाणजिंतूर - मेघना बोर्डिकरफुलंबरी - अनुराधाताई अतुल चव्हाणनाशिक पश्चिम - सीमाताई महेश हिरेकल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाडबेलापूर - मंदा विजय म्हात्रेदहिसर - मनीषा अशोक चौधरीगोरेगाव - विद्या जयप्रकाश ठाकूरपर्वती - माधुरी सतीश मिसाळशेवगाव - मोनिका राजीव राजळेश्रीगोंदा - प्रतिभा पाचपुतेकैज - नमिता मुंदडा 

कल्याण पूर्वेत महायुतीत वाद

कल्याण पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड हे इच्छुक होते. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद राज्यभरात गाजला होता. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. मात्र त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी भाजपाने या मतदारसंघात गणपत गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबातील कुणालाही उमेदवारी दिली तर मी अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा दिला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीत वाद पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, चिंचवड मतदारसंघातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप हे भाजपाचे आमदार होते, मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. परंतु आता या मतदारसंघात शंकर जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस