शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नौकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
3
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
4
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
5
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
6
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
7
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
8
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
9
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
10
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
11
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
12
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
13
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
14
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
15
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
16
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
17
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 
18
“स्वाभिमानाने लढलो, उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?”; राऊतांचा शिंदेंना टोला
19
मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...
20
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 5:50 AM

अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते.

यदू जोशी

मुंबई - महायुतीतअजित पवार गटाच्या आमदारांना ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली, तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान २० मतदारसंघांमध्ये पंचाईत होणार आहे. नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजूतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल.  

राज्यात २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आला. आता त्यांच्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची, तर आपले त्यावेळचे उमेदवार, मेहनत करणारे नेते, कार्यकर्ते यांची मने आणि मते अजित पवार गटाकडे वळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

नाराजीचे कारण काय?

अजित पवारांशी झालेली युती दुर्दैवी आहे आणि त्यांना सोबत ठेवले, तर विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल, असे विधान भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मध्यंतरी केले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा परंपरागत मतदार नाराज असल्याची चर्चाही सातत्याने होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते.

नवीन मित्राला जागा देताना मने अन् मते वळविण्याचे भाजपपुढे आव्हान

कुठे काेणती अडचण?

अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके आता अजित पवार गटाकडून लढू शकतात. खोडके यांनी गेल्यावेळी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांना पराभूत केले होते. बडनेरामध्ये भाजपचा रवि राणा यांना पाठिंबा असेल, हे स्पष्ट आहे. दोन्ही ठिकाणी भाजप नसेल.  मोर्शी मतदारसंघात भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांचा देवेंद्र भुयार यांनी ९७९१ मतांनी पराभव केला होता. तेच भुयार आता अजित पवार गटाकडून लढणार असल्याचे चित्र आहे.  

परळी, उद्गीर, अहमदपूर, माजलगाव, अहेरी, मावळ, आष्टी, अकोले, वाई, तुमसर, पुसद, फलटण येथे तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपविरुद्ध जिंकले होते, ते आज अजित पवार गटात आहेत. याशिवाय तीन अशा जागा आहेत ज्या गेल्यावेळी एकत्रित राष्ट्रवादीने जिंकल्या पण आता महायुतीत त्या अजित पवार गटाला हव्या आहेत. 

या मतदारसंघांमध्ये घासून झाल्या लढती

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांचा केवळ ७१८ मतांनी पराभव केला होता. आता चंद्रिकापुरे यांना महायुतीने पुन्हा संधी दिली, तर बडोले काय करणार हा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा ४,९९५ मतांनी पराभव केला होता. इंदापूरमध्ये माजी मंत्री भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी ३,१०० मतांनी पराभव केला होता. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा  ८२२ मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :BJPभाजपाAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४