मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यात भाजपाने पुढाकार घेत ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र त्यातच राज ठाकरे यांच्या मनसेनं स्वबळावर राज्यात निवडणूक लढवण्याचं जाहीर केले होते. आज मनसेची ४५ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमित राज ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मनसेच्या पहिल्या यादीत कोणाला स्थान?
कल्याण ग्रामीण - राजू पाटीलमाहिम - अमित राज ठाकरेभांडूप पश्चिम - शिरीष सावंतवरळी - संदीप देशपांडेठाणे शहर - अविनाश जाधवमुरबाड - संगीता चेंदवणकरकोथरुड - किशोर शिंदेहडपसर - साईनाथ बाबरखडकवासला - मयुरेश रमेश वांजळेमागाठणे -नयन कदमबोरिवली - कुणाल माईणकरदहिसर - राजेश येरुणकरदिंडोशी - भास्कर परबवर्सोवा - संदेश देसाईकांदिवली पूर्व - महेश फरकासेगोरेगाव - विरेंद्र जाधवचारकोप - दिनेश साळवीजोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरेविक्रोळी - विश्वजित ढोलमघाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कलघाटकोपर पूर्व - संदीप कुलथेचेंबूर - माऊली थोरवेचांदिवली - महेंद्र भानुशालीमानखुर्द शिवाजीनगर - जगदीश खांडेकरऐरोली - निलेश बाणखेलेबेलापूर - गजानन काळेमुंब्रा कळवा - सुशांत सूर्यरावनालासोपारा - विनोद मोरेभिवंडी पश्चिम - मनोज गुळवीमीरा भाईंदर - संदीप राणेशहापूर - हरिश्चंद्र खांडवीगुहागर - प्रमोद गांधीकर्जत जामखेड - रविंद्र कोठारीआष्टी - कैलास दरेकरगेवराई - मयुरी बाळासाहेब म्हस्केऔसा - शिवकुमार नागराळेजळगाव शहर - अनुज पाटीलवरोरा - प्रवीण सूरसोलापूर दक्षिण - महादेव कोनगुरेकागल - रोहन निर्मळतासगाव कवठे महांकाळ - वैभव कुलकर्णीश्रीगोंदा - संजय शेळकेहिंगणा - विजयराम किनकरनागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकरसोलापूर शहर उत्तर - परशुराम इंगळे
याआधीचे मनसेचे जाहीर झालेले उमेदवार
शिवडी - बाळा नांदगावकरवणी - राजू उंबरकरचंद्रपूर - मनदीप रोडेराजुरा - सचिन भोयरलातूर ग्रामीण - संतोष नागरगोजेहिंगोली - प्रमोद कुटेपंढरपूर - दिलीप धोत्रे