शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 7:06 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १३९ उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेना वगळता सर्वच पक्षात बंडखोरी झाली असून, आता ९२ जणांच्या माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

Maharashtra Election 2024: जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील लढतींचे चित्र सोमवारी माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले आहे. ९२ जणांनी माघार घेतल्याने ११ मतदारसंघात १३९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उरले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता एरंडोल, पाचोरा, जळगाव शहर व रावेरमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरांना रोखण्यात अपयश आले आहे.

चोपडा, भुसावळ, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर व मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर, जळगाव शहर व पाचोरा, एरंडोल अशा बहुसंख्य ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुक्ताईनगरात आरपारची लढाई

मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अॅड. रोहिणी खडसे यांना तर शिंदेसेनेकडून चंद्रकांत पाटील यांना संधी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची लढत रंगली होती. चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा अवघ्या १९५७ मतांनी पराभव केला होता. याठिकाणी मनसेकडूनही उमेदवार देण्यात आला आहे. या मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच थेट लढतीचे चिन्हे आहेत.

भुसावळातही काट्याची लढत

या मतदारसंघात भाजपने सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर काँग्रेसकडून डॉ. राजेश मानवतकर यांना संधी दिली आहे. जिल्ह्यातील राखीव मतदारसंघापैकी एक असलेल्या भुसावळ मतदारसंघातील लढतीकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चोपड्यात उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना

चोपडा मतदारसंघात उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेनेत थेट लढाई होणार आहे. शिंदेसेनेकडून माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे रिंगणात आहेत. तर उद्धवसेनेने भाजपाचे माजी जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांना आपल्याकडे खेचत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीने चंद्रकांत बारेला व माजी आमदार जगदीश वळवी यांची बंडखोरी रोखल्यामुळे या मतदारसंघात सोनवणे विरुद्ध सोनवणे अशी लढत होणार आहे.

एरंडोलमध्ये बंडखोरांनी उभे केले आव्हान

एरंडोल मतदारसंघात डॉ. सतीश पाटील व चिमणराव पाटील यांच्यात सलग पाचवेळा लढत झाली होती. यावेळी चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील व डॉ. सतीश पाटील हे उभे ठाकले आहेत. मात्र, या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली असून, माजी खासदार ए. टी. पाटील, उद्धवसेनेचे डॉ. हर्षल माने व भगवान महाजन यांनीही अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे.

रावेरात पंचरंगी लढत

रावेर मतदारसंघात यंदा पंचरंगी लढत होणार आहे. रावेर मतदारसंघात भाजपकडून दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना मैदानात उतरवले आहे. यासह प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल चौधरी व वंचित बहुजन आघाडीकडून शमिभा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे याठिकाणीही काट्याची लढत रंगणार आहे. त्यांच्यासह रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनीही अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.

चाळीसगावात जुन्या मित्रांची 'हायव्होल्टेज' लढत

चाळीसगाव मतदारसंघात एकेकाळी चांगले मित्र असलेले उमेदवार आमने-सामने आले आहेत. भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध माजी खासदार उन्मेष पाटील हे मैदानात उतरले आहेत.

चाळीसगावच्या लढतीला जिल्ह्यातील सर्वांत 'हायव्होल्टेज' लढत मानली जात आहे. मविआच्या जागावाटपात या जागेसाठी उद्धवसेना व शरद पवार गटात चांगलीच रस्सीखेच सुरु होती. शेवटी ही जागा उद्धवसेनेच्या वाट्याला गेली.

जळगावात बहुरंगी लढत

जळगाव शहर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्याविरुद्ध उद्धवसेनेने माजी महापौर जयश्री महाजन यांना संधी दिली आहे. भाजपने लेवा समाजाचे कार्ड खेळल्यानंतर उद्धवसेनेकडूनही लेवा विरुद्ध लेवा अशी लढत ठेवण्यासाठी जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली आहे. सुरेश भोळे हे विजयाची हॅटट्रिक करतात की, जयश्री महाजन विजयश्री खेचून आणतात याकडे लक्ष लागले आहे. त्यातच भाजपचे माजी उपमहापौर डॉ. र डॉ. अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांनी बंडखोरी केली असून, माघारीअंती त्यांचेही अर्ज कायम आहे. तर दुसरीकडे उद्धवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे जळगाव शहरात चौरंगी लढत रंगणार आहे.

दहा वर्षांनंतर दोन्ही गुलाबराव आमने-सामने

जळगाव ग्रामीण या मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत होणार असून, २०१४ नंतर पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दंड थोपटले आहेत. २००९ मध्ये हे दोन्ही नेते आमने-सामने आले होते. त्यात गुलाबराव देवकर यांचा विजय झाला होता. तर २०१४ मध्ये गुलाबराव पाटील हे विजयी झाले होते. २०१९ मध्ये देवकर यांनी उमेदवारी केली नव्हती. आता १० वर्षांनंतर दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत.

जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे

जामनेर मतदारसंघात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन व कधी काळी भाजपचे पदाधिकारी राहिलेले दिलीप खोडपे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडपे यांना उमेदवारी दिली आहे. गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग सहावेळा विजयी झाले आहेत. 

पाचोऱ्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष

पाचोरा मतदारसंघात ऐतिहासिक बहीण विरुद्ध भाऊ अशी लढत जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे व माजी आमदार दिलीप वाघ यांनीही अपक्ष उमेदवारी केल्यामुळे काट्याची लढत रंगणार आहे.

अमळनेरात काट्याची लढत

अमळनेर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील हे मैदानात आहेत. तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार असल्याने या मतदारसंघात काट्याची लढत रंगणार आहे.  

या मतदारसंघात बंडखोरी

रावेरमध्ये दारा मोहंमद जफर मोहंमद (काँग्रेस), जळगावमध्ये कुलभूषण पाटील (उद्धव सेना), डॉ. अश्विन सोनवणे, मयूर कापसे (भाजपा), एरंडोलमध्ये ए.टी. पाटील (भाजपा), डॉ. हर्षल माने (उद्धव सेना), डॉ. संभाजीराजे पाटील, अमित पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट), पाचोऱ्यात अमोल शिंदे (भाजपा), दिलीप वाघ (राष्ट्रवादी शरद पवार गट) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकjalgaon-city-acजळगाव शहरjalgaon-rural-acजळगाव ग्रामीणJalgaonजळगाव