महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 07:37 PM2019-10-21T19:37:07+5:302019-10-21T19:37:44+5:30

या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं

Maharashtra Election 29: 'Exit poll statistics wrong; Polls will be available on 24th date Says Congress leader Satej Patil | महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असून महाआघाडीला मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी महायुतीला २०० च्यावर जागा मिळतील आणि आघाडीला ७० जागा मिळणेही कठीण होईल अशी आकडेवारी दिली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचं वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपाचे जे लोकं निवडणुकीला उभे होते ते मतदारसंघ सोडून फिरले नाही, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट हे सगळे नेते राज्यभर फिरले. १५ वर्षात आम्ही इनकमिंग केलं नाही कारण सत्तेचा गैरवापर आम्ही कधीच केला नाही जर तो वापर केला असता तर नक्कीच तुमच्यातील बरेच नेते आमच्या पक्षात आले असते. भाजपाचे सगळे बंडखोर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी सक्रीय होते. हे उघड आहे असा आरोप सतेज पाटील यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याची गरज का पडली? तुमच्या सरकारचा ५ वर्षाचा कारभार नव्हता. त्यामुळे जिंकणारे उमेदवार भाजपात घेतले पण लोकांना हे सगळं पाहिलं आहे. लोकांनी मतदानातून त्याचं उत्तर दिलं आहे. येत्या २४ तारखेला त्याचं उत्तर मिळालं. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपाच्या एकाही नेत्यांनी राज्याच्या कारभारावर मतं मागितली नाहीत. देशाच्या प्रश्नावर राज्यातील जनतेचं पोट कसं भरणार? असंही सतेज पाटील यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

 नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

Web Title: Maharashtra Election 29: 'Exit poll statistics wrong; Polls will be available on 24th date Says Congress leader Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.