Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:27 AM2024-11-27T00:27:05+5:302024-11-27T00:28:53+5:30

महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे...

Maharashtra Election Deposits of 22 Mavia candidates seized, most from Congress; BJP has none | Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. निवडणूक लढविणाऱ्या सुमारे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील 261 उमेदवार तर पुण्यातील 260 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे.

3515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त - 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 4136 उमेदवारांपैकी 3515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. हे प्रमाण 85 टक्के एवढे आहे. 2014 मध्ये 83.1 टक्के आणि 2019 मध्ये 80.5 टक्के उमेदवारांना आपली अनामत रक्कम जप्त करावी लागली होती. 2014 मध्ये 3.4 कोटी रुपये तर 2019 मध्ये 2.6 कोटी रुपये एवढी अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. मात्र, 2024 मध्ये हा आकडा 3.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 10 वर्षात जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार -
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या एकूण 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यांपैकी नऊ उमेदवार एकट्या काँग्रेसचे आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आठ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (एसपी) तीन जागांवर अनामत रक्कम गमवावी लागली. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व 288 जागांपैकी भाजपच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही. याशिवाय, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) एका जागेवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागांवर अनामत रक्कम गमवावी लागली.

असा आहे नियम -
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्जासोबत 10 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 5,000 रुपये एवढी अनामत रक्कम जमा करावी  लागते. लोकप्रतिनिधी कायदा- 1951 नुसार, जर एखादा उमेदवार एकूण वैध मतांपैकी एक षष्ठांश मते मिळवू शकला नाही, तर आयोग त्याची अनामत रक्कम जप्त करतो.

कुणाला किती जागा मिळाल्या -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास अघाडीला केवळ 48 जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये, भाजपला 132, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) 57, राषट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20, काँग्रेस 16 तर राषट्रवादीला (SP) 10 आणि सपाला दोन जागा मिळाल्या आहेत.

Web Title: Maharashtra Election Deposits of 22 Mavia candidates seized, most from Congress; BJP has none

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.