शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:27 AM

महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. निवडणूक लढविणाऱ्या सुमारे 85 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील 261 उमेदवार तर पुण्यातील 260 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे.

3515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 4136 उमेदवारांपैकी 3515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. हे प्रमाण 85 टक्के एवढे आहे. 2014 मध्ये 83.1 टक्के आणि 2019 मध्ये 80.5 टक्के उमेदवारांना आपली अनामत रक्कम जप्त करावी लागली होती. 2014 मध्ये 3.4 कोटी रुपये तर 2019 मध्ये 2.6 कोटी रुपये एवढी अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. मात्र, 2024 मध्ये हा आकडा 3.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 10 वर्षात जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार -टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या एकूण 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यांपैकी नऊ उमेदवार एकट्या काँग्रेसचे आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आठ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (एसपी) तीन जागांवर अनामत रक्कम गमवावी लागली. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व 288 जागांपैकी भाजपच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही. याशिवाय, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) एका जागेवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागांवर अनामत रक्कम गमवावी लागली.

असा आहे नियम -विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्जासोबत 10 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 5,000 रुपये एवढी अनामत रक्कम जमा करावी  लागते. लोकप्रतिनिधी कायदा- 1951 नुसार, जर एखादा उमेदवार एकूण वैध मतांपैकी एक षष्ठांश मते मिळवू शकला नाही, तर आयोग त्याची अनामत रक्कम जप्त करतो.

कुणाला किती जागा मिळाल्या -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 236 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास अघाडीला केवळ 48 जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये, भाजपला 132, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) 57, राषट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20, काँग्रेस 16 तर राषट्रवादीला (SP) 10 आणि सपाला दोन जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा