Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:16 AM2019-11-24T05:16:08+5:302019-11-24T05:16:48+5:30

भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government:  'Ajit Pawar pushes palm; BJP uses money, power ' - Sanjay Raut | Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

Maharashtra Government: ‘अजित पवारांनी खंजीर खुपसला; भाजपने पैशांचा, सत्तेचा वापर केला’

Next

मुंबई : भाजपने सत्तेचा आणि पैशांचा वापर केला आणि एका रात्रीत चित्र पालटले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. या घडामोडींमागे केवळ अजित पवारच आहे. शरद पवार यांचा यात कोणताही हात नाही, या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी घडलेल्या घडामोडींवर प्रतिक्रीया व्यक्त केली.

राऊत म्हणाले की, शुक्रवारी रात्री ९ पर्यंत अजित पवार आमच्यासोबत चर्चा करत होते. मात्र, ते नजरेला नजर भीडवून बोलत नव्हते. जो व्यक्ती पाप करणार असतो, तोच नजरेला नजर भीडवू शकत नाही. त्यानंतर ते अचानक गायब झाले. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.

रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती भवन खोलून त्यांनी राष्ट्रपती राजवट हटविली. मोदींच्या राजवटीत हे सारे होत असल्याचे आश्चर्य वाटते. कितीही चोरी लबाडी करा पण हिंमत असेल तर ३० नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवा. आज सकाळी अजित पवारांसोबत गेलेल्या आठ आमदारांपैकी पाच परत आले आहेत. त्या आमदारांचे अपहरण झाले होते असेच म्हणावे लागेल.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते परत आले. कदाचित अजित पवारांना ब्लॅकमेल केले गेल्याने त्यांनी असा निर्नय घेतला असावा. पण, तुम्ही किती लोकांना ब्लॅकमेल करणार, किती लोकांच्या कानपट्टीला बंदूक लावणार असा सवाल राऊत यांनी भाजपला केला.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government:  'Ajit Pawar pushes palm; BJP uses money, power ' - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.