शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

Maharashtra Government: भाजपची रणनीती : बहुमतासाठी मुख्यमंत्र्यांचे आता ‘ऑपरेशन लोटस’!

By यदू जोशी | Published: November 25, 2019 8:34 AM

अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आॅपरेशन लोटस हाती घेतले आहे.

- यदु जोशीमुंबई : अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आॅपरेशन लोटस हाती घेतले आहे. त्यानुसार, इतर पक्षातील आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी पक्षातील ६ ते ७ नेत्यांवर जबाबदारी टाकण्यातआली आहे.गेल्या काही वर्षांत इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांना या ‘आॅपरेशन लोटस’ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजप आमदारांच्या बैठकीत आॅपरेशन लोटसचे सूतोवाच केले. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकण्यासाठी आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ आपल्याकडे आहेच, पण आपण अधिक संख्येनिशी दोन्ही गोष्टींबाबत यशस्वी व्हायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांवर या आॅपरेशनची विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. जुन्या पक्षांमधील आपल्या संबंधांचा वापर करा आणि अधिकाधिक आमदारांना जोडा, असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. या नेत्यांना भाजपची आॅपरेशन लोटस कोअर टीम मदत करेल. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे असे नेते असतील. त्यांच्या मदतीला भाजपच्या चार तरुण आमदारांची टीम असेल.इतर पक्षांमधील आमदारांना फोडून सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी सुरुवातीला मांडली होती. मात्र, नंतर घडलेल्या प्रचंड घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपच्या गळाला लागले आणि थेट उपमुख्यमंत्री झाले. आता भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी आॅपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे. भाजप-शिवसेनेचे पाच वर्षे सरकार असताना भाजपकडे बहुमत नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा विरोध, टीका सहन करत फडणवीस त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. यावेळी ही परिस्थिती राहू नये, म्हणून भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी आॅपरेशन लोटस राबविण्यात येणार असल्याचे मानले जाते.भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष गुजरातमध्येभाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही तातडीने गुजरातला हलविले आहे. चार ते पाच जणांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी संपर्क साधू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019